Read this article in:
English |
Gujarati |
Hindi |
Marathi |
Russian |
Spanish |
Tamil

हिंदु दृष्टिकोन असा आहे की देवत्वाचे बीज सर्व लोकात आहे. माझ्या गुरूंचे गुरु, श्री लंकेचे शिव योगस्वामी, ही कल्पना अगदी सोप्या शब्दांत व्यक्त करायचे. “सर्वांकडे ती व्यक्ति देव आहे या दृष्टीने बघा. असे म्हणू नका की ‘हा मनुष्य चोर आहे. हा मनुष्य अनैतिक संबंध ठेवतो. तिथे तो मनुष्य दारुड्या आहे.’ हा मनुष्य देव आहे. तो मनुष्य देव आहे. देव सर्वात आहे. ते बीज तेथे आहे. ते लक्ष्यात घ्या आणि बाकी सर्वाकडे दु:खाकडे दुर्लक्ष करा.” देवत्व नाही असे कुणीच नाही आणि कुणीहि अनाद्यन्त नरकांत खितपत पडत नाही हे एक महत्वाचे आश्वासन आहे. किमपि प्रश्न एवढाच आहे की एखाद्या व्यक्तीचे देवत्व कधी प्रगट होईल. कदाचित् आणखी काही जन्मानंतर. आध्यात्मिक विकास काही झाले तरी एक मंदगतीचा अनाराध्य अनुक्रम आहे.

माझे स्वतःचे गुरु शिवाय शुभ्रमुनीय स्वामी यांनी या अनुक्रमाला, ज्याला संस्कृतमध्ये अध्यात्म विकास म्हणतात, त्याला एक मर्मज्ञ उपमा सुचविली आहे. ज्याचे बीज एका काळ्याभोर चिखलाच्या डबक्यात उगवते त्या कमळाबद्दल ते बोलले. त्याच्या मुळाचे कोंब पाण्यातून वर वातावरणात येते. त्यातून त्याचे एका कळीत रूपान्तर होते. प्रथम अगदी लहान असलेल्या ह्या कळीचे हळुवार कमळाच्या फुलात रूपान्तर होते. आपली कमलदले ते सूर्यप्रकासाठी उघडते. मध्यभगी असलेला मकरंद आणि पराग मधमाशांसाठी उघडते. गुरुदेव या प्रक्रियेची मानवाच्या स्वभावाची आणि अध्यात्म विकासाची तुलना करतात. चिखल ही मानवची नैसर्गिक मनोवृत्ति आहे. आपल्या सर्वांच्या जीवनाची सुरुवात एखाद्या जन्मी या चिखलांत होते. आपल्या विकासाच्या प्रारंभी आपण अगदी आपक्व आणि निर्दय असतो. आपण लोकांची मने दुखवतो आणि इतरांपेक्षा स्वतःबद्दल जास्त विचार करतो. (यामुळे) कदाचित् आपण तुरुंगातही पोहोचू शकतो. आपली ही जीवनयात्रा त्या मुळापासून आपल्या नैसर्गिक मनोवृत्तीच्या अन्धःकारात चिनी मातीच्या भांड्यांच्या दुकानात धुमाकूळ घालणार्या बैलासारखी सुरु होते.

जन्मजन्मान्तरी आपण जगतो आणि शिकतो. शेवटी आपण आपल्या नैसर्गिक मनोवृत्तींचा ताबा घेतो आणि वर पाण्यात चढतो, ज्याची तुलना होते आपल्या बुद्धिवादी मनाशी. आपण एक विचारवन्त व्यक्ति होतो, जी तर्कशुद्ध निर्णय घेण्यास समर्थ असते अशी, ज्या व्यक्तीचा आपल्या नैसर्गिक भावनावर तन्मात्र संयम आहे आणि जी धोक्याचे चिन्हे दिसताच सह्जच क्रोधित होऊन संघर्षाला तयार होते.

आयुष्यातल्या या टप्प्याला आपण एक नैसर्गिक बुद्धिवादी व्यक्ति असतो, काही अंशी प्राणिमात्रांसारखे नैसर्गिक मनोवृतीच्या चिखलात आणि काही अंशी बुद्धिवादी पाण्यात. अशा व्यक्तीला परमेश्वराची आणि जीवनाच्या पावित्र्याची कल्पना नसते. हे जग अशा लोकांनी, नास्तिक, देहात्मवादी आणि अस्तित्ववादी लोकांनी भरलेले आहे. जो उद्देश या जीवनापलीकडे घेऊन जाणारा असतो त्या आपल्या या जीवनाच्या आध्यात्मिक उद्देशाची त्यांना स्मृति उरलेली नसते.

मग काय होते? कमळाचे ते कोंब वाढून पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येते. ते पाण्याच्या वर येऊन हवेत वाढते. ही हवा म्हणजे आपले अन्तर्ज्ञान, आपली आध्यात्मिक वृत्ति किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाची थोडीशी जाणिव. आपण धर्माबद्दल विचार करायला सुरुवात करतो, आध्यात्मिक उपासनेबद्दल विचार करायला लागतो. नैसर्गिक मनोवृतीने आणि बुद्धिवादी मनोवृत्तीने सर्वसाधारण वस्तुंचा पीच्छा करणे या गोष्टींनी आपले समाधान होत नाही. परन्तु ती कमळाची कळी अजून बंदच आहे. पूर्ण परिपक्व होऊन उघडायला अजून तयार नाही. या बंद कळीला परमेश्वर बाहेर कोठेतरी आहे हे माहित असले तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो.

ही कळी उमलण्याचे काय कारण आहे? जन्मोजन्मी मिळणारे शिक्षण आणि त्यामुळे वाढणारे प्रौढत्व, बुद्धांचा प्रसाद, देवदेवतांचे आशिर्वाद आणि अध्यात्म अभ्यास. ही कळी खुलविण्यासाठी आपल्याला जाणून प्रयत्न करावा लागतो.

हिन्दु धर्माने पुरस्कृत केलेल्या धार्मिक प्रथांचे आपल्याला चार विभाग करता येतात. प्रथम विभाग म्हणजे उत्तम वर्तणूक, चारित्य्रवर्धन, चर्या. अधिक गूढ अनुष्ठानाचा हा पायवा होतो. द्वितीय विभाग आहे निःस्वार्थी सेवा किंवा कर्मयोग- इतरांसाठी आपल्यावर जबाबदारी नसलेले काम करणे. मी त्याची अशी व्याख्या करतो. आपल्या कार्यालयात आपण जर केवळ आपल्या चांगुलपणामुळे काही केले तर त्याला सेवा म्हणता येईल. सेवा मंदिरात किंवा आश्रमात करावी लागते असे नाही. नोकरी करतांना आपण फक्त आपल्याला पगार मिळण्यासाठीच काम केले तर सेवा घडत नाही.

तिसरा विभाग म्हणजे भक्ति, जी आपण मंदिरात आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या देवघरात व्यक्त करू शकतो. घरी कायम देवघर ठेवणे आणि रोज तेथे पूजा करणे हे एक महत्वाचे अनुष्ठान आहे. चौथे आहे ध्यान. ध्यान हे उच्चस्तरावरचे अनुष्ठान असल्यामुळे ते योग्यप्रकारे करावयास गुरुची मदत लागते. मी ज्या लोकांशी बोलतो त्यापैकी बहुतांशी म्हणतात मी ध्यान करायचा प्रयत्न करतो पण मी माझे विचार आवरु शकत नाही. कारण त्यांना गुरु नाही. ध्यान करण्याची कला त्यांना कुणी समजावून दिली नसते. स्वतः ध्यान करायला शिकलेला मनुष्य विरळाच.

याप्रमाणे अनुष्ठानाचे चार विभाग आहेत: उत्तम वर्तणूक, सेवा, भक्ति आणि ध्यान. जेव्हा तुम्ही यापैकी काही नियमित करायचे ठरवले तर त्याचा काय परिणाम होतो? ती कमळाची कळी खुलते. तुमचे देवत्व, जे आतापर्यन्त शान्तपणे त्या कळीत प्रतीक्षा करत होते, त्याचा विकास होतो.

अनेक पाश्चिमात्य आदर्श आणि साध्य आपल्याला एकच जीवन आहे किंवा कदाचित् आपल्याला हे एकच आयुष्य आहे म्हणून आपण आताच सर्व काही केले पाहिजे या मनःस्थितीवर आधारित आहेत. ब्राह्मिस्थिती आपल्याला या जीवनात मिळाली तर बरे. उलट याबद्दल हिन्दु विचार असा आहे की मला जाणिव आहे की मी पुन्हा परत येणार आहे. काही घाई नाही. या जन्मात मला जेवढे शक्य आहे तेवढे मी करीन. पुढच्या प्रगतीला भरपूर वेळ मिळेल. प्रत्येक जन्मात आध्यात्मिक प्रगति करायची हा हिन्दु मार्ग आहे. ती कमळाची कळी थोडी खुलवायची. यथासंभव प्रगती करून पुढे जाण्यात आपण समाधान मानतो, काही प्रकर्षाने घाई न करता. आपल्याला खात्री आहे की देवत्वाचे बीज प्रत्येकात आहे.

ही कल्पना हिन्दु धर्म एक पाउल पुढे नेतो. अखेर आपणा सर्वांना ब्रह्मज्ञान मिळेल, आपल्या अन्तःकरणात वास्तव्य असलेल्या देवाचे ज्ञान होईल. श्वेताश्वतर उपनिषद म्हणते: जीवात्म्याची आणि आत्म्याची एकता होऊन, जणु काही दिव्याच्या प्रकाशात ज्याला ब्रह्मज्ञान होते, ज्याला परमेश्वराच्या अज, शाश्वत आणि निराकार रूपाचे ज्ञान झाले असते, तो सर्व बन्धनापासून मुक्त होतो. ही कल्पना पाश्चात्य धर्मात प्रचलीत असलेल्या कल्पनेपेक्षा, की ईश्वर स्वर्गात आहे आणि या धरतीवर आपल्याला त्याची अनुभूति मिळणे शक्य नाही, या कल्पनेपेक्षा अगदी वेगळी आहे. गुरुदेव या दैवी सान्निध्याबद्दल नेहमी बोलायचे: “ईश्वर आपल्या किती जवळ आहे. तो आपल्या श्वसोच्छ्वासापेक्षा जवळ आहे, आपल्या हातापायापेक्षा जवळ आहे.” होय, हाच आपल्या आत्म्याचा अतीव सार आहे.

कमळाच्या फुलाच्या उपमेकडे परत. जेव्हा कमळ पुरेसे फुललेले असते तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक किंवा अन्तर्ज्ञानी वृत्तीपर राहतो. एक प्रश्न विचारा: आध्यात्मिक प्रगति कोण करतो? कशाचा विकास होतो? या प्रश्नांचे उत्तर आहे, आत्मा. अध्यात्म विकसाचा विचार करतांना आत्म्याचे रूप समजणे उपयुक्त होते. आत्मशरीर आणि त्याचे सार असे त्याचे आपण पृथक्करण करतो. सार आहे ते दोन प्रकारचे: शाश्वत शुद्ध चैतन्य, आणि काल, आकार, अवकाशाच्या पलिकडे असलेले निस्सीम परम सत्य. आत्मशरीर हे मानवी शरीरासारखे परन्तु प्रकाशाचे असल्यामुळे स्वयंतेजस्वी आणि विकसित होत असते. या अजरामर आत्मशरीराला संस्कृतमध्ये आनन्दमय कोश म्हणतात. हे ते आत्मशरीर आहे, जे त्या कमळाच्या फुलासरखे फुलते. आत्म्याचे सार परमेश्वरासारखेच सनातन संपूर्ण आहे. ज्याप्रमाणे आपल्या भौतिक शरीराचा शिशुवस्थेपासून प्रौढावस्थेत विकास होतो, त्याचप्रमाणे हे स्वयंतेजस्वी आत्मशरीर आपल्या प्रगल्भतेत आणि बुद्धिमत्तेत विकसित होते. जन्मोजन्मी विकसित होऊन आपली अन्तर्स्नायुशक्ति प्रबळ करून ईशवराच्या अज्ञानाकडून ईश्वराच्या साक्षात्काराकडे प्रगति होते.

गुरुदेवांनी “शिवे विलयम्” या ग्रन्थात स्वतःचा अद्भुत अनुभव असा वर्णिला: एक दिवस तुम्ही स्वतःचा आत्मा, स्वतःचे दैवी आत्मशरीर बघाल. ते तुम्हाला स्वतःच्या भौतिक शरीरात दिसेल. ते निर्मल, स्वच्छ कचकड्यासारखे दिसते. त्याभोवती एक निळ्या प्रकशाचे मण्डल असते आणि त्याची रेखाकृति पांढरी-पिवळी असते. त्याच्या आंत पिवळसर निळ्या रंगाचा प्रकाश असतो आणि त्यात असंख्य सूक्ष्म स्नावप्रवाह अथवा परिमाण असतात. त्या सर्वातून प्रकश झगमगत असतो. हे शरीर एका कमळावर उभे असते. आपल्या पावलांकडे खाली बघितले तर आपण एका मोठ्या सुंदर कमळावर उभे आहोत असे दिसून येते. या शरीराला मस्तक आहे, डोळे आहेत, आणि त्याला अपरंपार बुद्धि आहे. सर्व शक्तीच्या उगमाशी ऐक्य करून त्या शक्तीचे ते प्राशन करते.

अध्यात्म विकासाचे आणखी एक अंग आहे. एक हिन्दु सन्त, साधु, स्वामी, हयात किंवा मृत, ज्यांनी अत्युच्च्य आध्यात्मिक विकास प्राप्त केला असे तुम्हाला वाटते अशा व्यक्तीला निवडा. आता अशी कल्पना करा की त्यांनी मिळवलेले यश मिळविणे तुम्हाला शक्य आहे. या कल्पनेचा स्विकार करा. हे एक मोठे आश्चर्यकारक सत्य आहे. इतर कुणीही मिळवलेले आध्यात्मिक यश मिळविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि भविष्यकाळी कधीतरी ते आविर्भूत होऊ शकते. हा विचार कदाचित् तुम्हाला आध्यात्मिक अनुष्ठानात आणखी थोडा जास्त प्रयत्न करायल प्रोत्साहन देईल. आपल्या मनःचक्षूपुढे ते तेजस्वी कमळ पूर्णपणे फुललेले बघा-ते तुमच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतिक आहे.

अर्थातच हे सामर्थ्य तुम्ही जेव्हा परिश्रम करता तेव्हाच प्रत्यक्षात येते. तुम्ही अध्यात्म विकासचा खरोखर ध्यास घेतला असेल तर स्वतःला काही प्रश्न विचारा: माझ्या आयुष्यात ही चार प्रकारची अनुष्ठाने मी कशी वापरतो? उत्तम वर्तणूक? सेवा? भक्ति? ध्यान? आणि योग? यापैकी कोणत्या अनुशासनाकडे मला अधिक लक्ष द्यायला हवे आणि प्रयत्न वाढवायला हवा? सुधारणा करण्यासाठी मला आणखी काय करायला हवे? आणि ते करा.